Monday, December 4, 2023

शेतकरी ‘राजा’….लक्झुरियस ‘ऑडी’तून येऊन भाजी विक्री…व्हिडिओ

शेतीचा व्यवसाय तसा बिनभरोशाचा म्हटला जातो. शेती करणे हा तसा आतबट्ट्याचा व्यवहार मानला जातो. लहरी हवामानामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होते. तर कधी भाव न मिळाल्याने उत्पादन कचऱ्यात फेकून द्यावे लागते. तरी काही शेतकऱ्यांनी मेहनतीच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने योग्य पद्धतीने शेती करून कमाई देखील होत आहे. टाईम्समध्ये आलेल्या बातमीनूसार केरळच्या या ऑडीवाल्या शेतकऱ्याचे नाव सुजीत आहे. तो देखील आधुनिक शेतकऱ्यांच्या पिढीचा प्रतिनिधी आहे. त्याने शेतीसाठी प्रगत तंत्रज्ञान वापरले आहे. आणि आज तो यशस्वी शेतकरी बनला असून अनेक शेतकऱ्यांचा आदर्श बनला आहे. लोक त्याला रस्त्याच्याकडेला ऑडी कार उभी करून भाजी विकताना पहातात तर आश्चर्यचकीत होऊन जातात. एका शेतकऱ्यांच्या या प्रगतीने सारे स्तंभीत झाले आहेत.सुजीत त्याच्या विभागात खूप लोकप्रिय आहे. सोशल मिडीयावर त्याचे अकाऊंट आहे. तो शेतीची माहीती शेअर करीत असतो. त्याच्याकडून अनेक जण प्रेरणा घेऊन जैविक शेती शिकत आहेत. इस्टाग्रामवर सुजीत शेअर केलेल्या व्हिडीओत ऑडी कारमधून उतरतो. बाजारात पथारी पसरत त्यावर पालेभाज्या विकताना दिसत आहे. या व्हिडीओत त्याच्या भाजीच्या जुड्या पटापट विकल्या जाताना दिसत आहे. नंतर तो आपल्या ऑडीमधून घरी जाताना दिसत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: