नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान मॅच दरम्यान एका तरुणानं महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत गैरव्यवहार केला. जेव्हा तिनं या तरुणाला जाब विचाराला तेव्हा तो अत्यंत वाईट पद्धतीनं तिच्यासोबत भांडण करू लागला. अखेर महिलेचा पारा चढला अन् तिनं त्या बेशिस्त तरुणाला पार थोबडावून काढलं. नारी शक्तीचा हा व्हिडीओ पाहून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तर घामच फुटेल. हा व्हिडीओ @Politics_2022_ या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत गैरव्यवहार करत आहे. सुरूवातीला दोघांचे शाब्दिक वाद सुरू आहेत. तरुण अत्यंत वाईट पद्धतीनं त्या महिलेची हुज्जत घालतोय. परिणामी महिलेनं त्या तरुणाला थेट थोबाडीत मारली. त्यानंतर तरुणाचा पारा आणखी चढला अन् तो थेट त्या पोलीस कर्मचारी महिलेला मारण्याचा प्रयत्न करू लागला. पण महिला देखील प्रतिहल्ला करण्यास तयार होती. तिनं वार चुकवला आणि त्याला चांगलंच झापलं.
https://x.com/Politics_2022_/status/1713453550414770274?s=20