Monday, December 4, 2023

कुकर वापरुन घरच्या घरी सोप्या पध्दतीने बनवा शुध्द तूप…व्हिडिओ

गायीच्या किंवा म्हशीच्या दुधाचे दही लावून आणि दह्यापासून लोणी काढून ते कढवून घरगुती साजूक तूप तयार केले जाते. तूप हे दुधापासून तयार होत असल्याने दुधातील स्निग्ध पदार्थस्नात विरघळणारी सगळी जीवनसत्त्वे तुपातसुद्धा असतात. सध्या सोशल मीडियावर तूप बनवण्याची नवी पद्धत व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चक्क कुकरमध्ये तूप कसे बनवायचे सांगितले आहे. इंस्टाग्रामवर bhagyashree.bhandari.1वर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
कुकर गॅसवर गरम करायला ठेवा.त्यात तांब्याभर पाणी टाका.नंतर त्यात तयार लोणी टाका. कुकरचे झाकण लावून दोन शिट्टी येऊ द्या. गॅस बंद करा आणि शिट्टीतून वाफ जाऊ द्या.त्यानंतर झाकण काढा आणि पुन्हा गॅसवर तूप उकळवायला ठेवा.तुपात चार-पाच लवंग टाका म्हणजे तूप करताना वास येणार नाही.१५ मिनिटे उकळी येऊ द्या. त्यानंतर तूप तयार होईल. तयार तूप गाळून घ्या आणि एका बरणीमध्ये साठवून ठेवा.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: