जिलेबी आपल्यापैकी अनेकांना खायला आवडते. कोणताही ऋतू असो, जिलेबी खाण्याची एक वेगळी मज्जा असते. विशेषत: गोड पदार्थ आवडीने खाणारे काहीजण जिलेबी देखील तितकीच आवडीने खातात. पण अनेकांच्या आवडत्या जिलेबीवर एका विक्रेत्याने वेगळा प्रयोग केला आहे. जो युजर्सना अजिबात आवडलेला नाही. व्हायरल होणाऱ्या या भलत्याच पदार्थामुळे जिलेबीकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन बदलला आहे, यात ज्यांना जिलेबी आवडते त्यांनी या पदार्थावर संताप व्यक्त केला आहे .एका फूड वेंडरने जिलेबी आणि बटाट्याची रस्सा भाजी अशी एक भलतीच डिश तयार केली आहे. या विचित्र फूड फ्यूजनचा एक व्हिडीओ इ्न्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे, ज्याने ‘क्लासिक डेजर्ट’प्रेमींना निराश केले आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका फूड वेंडरने जिलेबीच्या मांडलेल्या ढीगमधून ४ ते ५ जिलेबी एका प्लेटमध्ये घेतल्या, यानंतर त्यात बटाट्याची रस्सा भाजी मिसळली. यानंतर त्यात कोणतीतरी चटणी आणि थोडे दही टाकले, ज्याप्रमाणे दही कचोरी बनली जाते त्याप्रकारे हे जिलेबी- बटाट्याची रस्सा भाजीचे हे कॉम्बिनेशन बनवण्यात आले. २२ सेकंदांच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बटाट्याचा रस्स्यासोबत जिलेबी… हा कसला नाश्ता आहे?… पण तु्म्हाला खोट वाटेल, जिलेबी, बटाट्याची रस्सा भाजी आणि दहीचे हे कॉम्बिनेश काहीजण आवडीने खात आहेत. नेहमी हे दोन्ही पदार्थ वेगवेगळे खाल्ले जातात. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये हे कॉम्बिनेशन एकत्र खाल्ले जात आहे.
Jalebi with Aloo Sabzi… Aisa bhi nashta hota hai kya? Batao mitron pic.twitter.com/90YnE03x9I
— Mohammed Futurewala (@MFuturewala) July 5, 2023