व्हिडीओत तुम्ही पाहाल तर महिला आपण सामान्यपे जशी चपाती बनवतो तशीच बनवते. ती चपाती गॅसवर शेकवते. चिमट्याने काढून ती भांड्यात ठेवते. पण तुम्ही पाहिलं असेल गॅस किंवा तव्यावरून चपाती थेट भांड्यात ठेवली की सर्वात आधी केलेली चपाती जी तळाला असते, त्याला पाणी सुटतं. इथंच तुम्हाला ही चहाची गाळणी कामी येणार आहे.चपातीवर वाफ असते त्यामुळे चपाती जेव्हा आपण थेट भांड्यात ठेवतो आणि ती थंड होते तेव्हा त्या वाफेचं रूपांतर पाण्यात होतं. चपातीला पाणी सुटतं आणि ती ओली होते. त्यामुळे गॅस किंवा तव्यावरून चपाती काढल्यानंतर ती थेट भांड्यात ठेवू नका. तर आधी चहाच्या गाळणीवर काढा. म्हणजे चपातीची वाफ निघून जाईल. किंचितशी ती थंड होईल. त्यानंतर भांड्यात ठेवा. चपातीला वाफ नाही, त्यामुळे चपातीला पाणीही सुटणार नाही.
चपाती करण्याची भन्नाट ट्रिक, चहाच्या गाळणीचा असा करा वापर…व्हिडिओ
- Advertisement -