अनेकदा बऱ्याच दिवसांकरता घराबाहेर जात असताना फ्रिजमध्ये ठेवलेलं दूध खराब होईल या भीतीने बरेचजण ते शेजाऱ्यांना देतात किंवा संपवून टाकतात. परंतु आता असं करण्याची गरज नाही. सोशल मीडियावरील क्रिएटर सर्च 2.0 या यूट्यूब चॅनेलने दूध खराब होऊ नये याकरता एक भन्नाट किचन जुगाड सांगितला आहे.बरेच दिवस दूध चांगले राहावे यासाठी तुम्ही दुधात तुळसीची पाने टाकू शकता. तुळशीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने ते दुधाला लवकर खराब होऊ देत नाही. त्यामुळे बरेच दिवस दूध खराब न होता चांगले राहते असा व्हिडीओ तयार करणाऱ्या क्रिएटरचा दावा आहे.
Video…’ही’ एक गोष्ट मिसळा 10 दिवस ताज राहील दूध…दूध खराब होण्याची चिंता विसरा
- Advertisement -