तुम्ही शॅम्पूचा वापर केस धुण्यासाठी केला असेल. हाच शॅम्पू किचनमध्ये गॅससाठीही फायद्याचा ठरू शकतो. याचा जबरदस्त असा किचन जुगाडकिचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. तुम्हाला असा विचित्र वाटेल. परिणाम पाहिला तर तुम्ही चकित व्हाल.
दिवसभर गॅसवर चहा, नाश्ता, स्वयंपाक असं सतत काही ना काही करत असतो. स्वयंपाक करताना काही गोष्टी गॅसवर सांडतात आणि गॅसची शेगडी खराब होते. यातही दूध, तेल असं काही सांडलं की ही शेगडी फारच चिकट आणि मेंचट होऊन जाते. नियमितपणे ही शेगडी साफ केली तर ठिक नाहीतर त्यावर थर जमा व्हायला लागतात.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्वयंपाक करुन झाल्यावर गॅसच्या शेगडीवर पाणी घाला आणि त्यावर सगळीकडे शॅम्पू टाका. १५ मिनीटे हे तसेच ठेवा, तोपर्यंत इतर कामं करा. १५ मिनीटांनी सुक्या कापडाने साफ करा. व्हिनेगर आणि सोड्यामुळे गॅस शेगडी एकदम चकाचक दिसेल.