बिबट्या हा अत्यंत खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. गर्द झाडी असो वा गडद अंधार बिबट्या अगदी सऱ्हाईतपणे शिकार करतो. पण विचार करा इतका खतरनाक शिकारी जर तुमच्या मागे लागला तर काय होईल? होय, असाच काहीसा प्रकार या तरुणासोबत घडलाय. तो झाडावर चढलेला असताना बिबट्या त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करतोय. बरं, ते झाड इतकं लहान आहे की कदाचित त्या तरुणाच्या वजनानं मोडून सुद्धा जाईल. त्यातच बिबट्या सुद्धा त्यावर चढलाय. दरम्यान बिबट्याला रोखण्यासाठी तो झाडाच्या फांदीनं त्याच्या तोंडावर वार करतोय.
- Advertisement -