मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास सांगणारा ‘संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट येत्या १४ जूनला प्रदर्शित होणार आहे. पण, या चित्रपटात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या भूमिका कोण करणार? याची कमालीची उत्सुकता अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना होती. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, छगन भुजबळ यांची भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी, तर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका शिवाजी दोलताडे यांनी साकारली आहे.q
Video…संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील चित्रपट… यांनी साकारल्या छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्तेंची भूमिका
- Advertisement -