सोशल मीडिया वर असाच एक भावोजी आणि मेव्हणीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
नवरदेवासोबतच मस्करी करण्यात कलवऱ्या म्हणजेच मेहुण्या नेहमी पुढे असतात. अशातच एका कलवरीनं भलतीच करामत केली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नाची लगबग सुरु आहे. सर्व नातेवाईक लग्नाचा विधी सुरु असताना बाजूला बसले आहेत. तेवढ्याच पंडीत नवरदेवाचा लग्नाच्याच विधीतला एक भाग करण्यासाठी सांगतात. यावेळी नवरदेत उठतो, याच संधीचा फायदा घेत ही कलवरी मेहुणी बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या गळ्यात हार घालण्याचा प्रयत्न करते. मात्र हा तिचा डाव फसतो आणि ती धाडकन तोंडावर आपटते.