Friday, December 1, 2023

Video…मोठा गौप्यस्फोट… रोहित पवार 2019ला भाजपकडे हडपसर मतदारसंघात तिकीट मागत होते…

*मोठा गौप्यस्फोट…. .रोहित पवारांनी पहिलं तिकीट ब्लॅकमेलिंग करून मिळवलंय!*
*जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )*
अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याआधीच आमदार रोहित पवार भाजपात जाण्याच्या तयारीत होते असा गौप्यस्फोट केला होता.
या वक्तव्याला भाजप आमदार राम शिंदे यांनी दुजोरा देत आमदार रोहित पवारांवर निशाणा साधलाय. आमदार रोहित पवारांनी त्यांच्या आयुष्यातलं पहिले राजकीय तिकीट ब्लॅकमेल करूनच मिळवल्याचं राम शिंदे यांनी म्हंटलंय.
ते म्हणाले आहेत की, 2017 साली त्यांनी राष्ट्रवादीला धमकी दिली होती. जिल्हा परिषदेचे तिकीट देता की, मी भाजपात जाऊ. तसेच रोहित पवार यांनी 2019 साली हडपसरसाठी भाजपकडं तिकीट मागितलं हो,तं असं भाजप आमदार राम शिंदे यांनी म्हटलंय.
रोहित पवार हे भाजपाच्या तिकिटासंदर्भात तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे हडपसर आणि शिवाजीनगर विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी गेले होते असं राम शिंदे म्हणाले.अजित पवार हे 30 वर्षापासून राजकारण करताय त्यामुळे ते नेते झाले. आपल्यात तेवढी क्षमता आहे का? हे ओळखून वक्तव्य करावं, असा टोला राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावलाय. तर कोणाच्या कपाळाला कपाळ घासून यश मिळत नाही, असा खोचाक सल्लाही त्यांनी रोहित पवार यांना दिलाय. . . . प्रतिनिधी नासीर पठाण सह पत्रकार अशोक निमोणकर चोंडी जामखेड .

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: