‘आयसीसी विश्वचषक २०२३’ या स्पर्धेत भारतीय संघाने गुरुवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशचा ७ विकेट्सने पराभव केला. भारताच्या विजयानंतर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. कालच्या मॅचला प्रेक्षक म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने हजेरी लावली होती. भारताने बांगलादेशला हरवल्यानंतर गौरव मोरेसह क्रिकेट समीक्षक सुनंदन लेलेंनी स्टेडियमबाहेर जल्लोष करत आनंद व्यक्त केला. सध्या या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गौरव मोरे महत्त्वाच्या भूमिकेत असलेला ‘बॉईज ४’ चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील गाव सुटना या गाण्यावर गौरवसह सुनंदन लेले स्टेडियमबाहेर थिरकले हा व्हिडीओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या या दोघांच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Video..‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे आणि सुनंदन लेलेंनी मैदानाबाहेर केला जल्लोष..
- Advertisement -