डान्स ही एक कला आहे असं म्हणतात. पण हा डान्स पाहिल्यानंतर याला कला म्हणायचं की आणखी काय? असा प्रश्न तुम्हाला पडेल. व्हिडीओमध्ये तुम्ही एका तरुणाला नागिन डान्स करताना पाहू शकता. म्युझिक ऐकताच जणू त्याच्या अंगात नाग संचारतोय, त्याचं शरीर जणू नागात रूपांतर होतंय असा अभिनय तो करू लागला. दरम्यान त्यानं जो काही डान्स केलाय आणि चेहऱ्याचे हावभाव दाखवले आहेत ते पाहून खरंच तुम्हाला हसू आवरणार नाही. या तरुणानं अशा अशा स्टेप्स मारल्या आहेत ज्या कुठल्याच डान्स स्कूलमध्ये शिकवल्या जाऊ शकत नाही. हा डान्स पाहून खऱ्याखुऱ्या नागाला सुद्धा चक्कर येईल.
- Advertisement -