बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यातली एक म्हणजे निक्की तांबोळी. निक्कीची घरात एन्ट्री झाल्यानंतर एक डायलॉग बराच लोकप्रिय झाला तो म्हणजे बाईईई…! छोट्या पुढारीशी संवाद साधताना निक्कीद्वारे बोलण्यात आलेल्या या डायलॉगवर सोशल मीडियावर अनेक रिल्स बनवण्यात आले. एका चिमुकल्याने त्याच्या आजीसाठी निक्कीच्या डायलॉगवर गाण बनवलं आहे. व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिलं असेल की, बाप्पा घरात विराजमान झाले आहेत. आजीचा नातू नेहमी तिला मशेरी लावताना पाहतो व त्याला ती गोष्ट अजिबात आवडत नाही . म्हणून आजीची मशेरी बहुदा तो कुठेतरी लपवून ठेवतो आणि म्हणतो की, “बाईईई… मशेरी कुठे गेली, बाईईई… कुठे गेली आता शोध, बाईईई… काय हा प्रकार शी, बाईईई…” असं गाणं म्हणण्यास सुरुवात करतो. यादरम्यान त्याचे मजेशीर हावभाव, त्याचा डान्स देखील पाहण्यासारखा आहे ; जो पाहून तुम्हालाही हसू येईल.
- Advertisement -