देशातील एका गंभीर प्रश्नावर उत्तर देताना आंतराष्ट्रीय स्तरावर या समस्येमुळे मला तोंड लपवण्याची वेळ येते अशी नाराजी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी बोलून दाखवली आहे. ते गुरूवारी (दि.12) लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तरे देताना बोलत होते.
लोकसभेत बोलताना गडकरी म्हणाले की, रस्ते अपघातांबाबत (Road Accident) आपल्या देशाचा रेकॉर्ड इतका वाईट आहे की, आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी मला तोंड लपवावे लागते. रस्ते अपघात कमी करण्यासाठी त्यांच्या मंत्रालयाकडून विविध प्रयत्न करण्यात आले, मात्र अपघात कमी झाले नसून ते वाढले आहेत. जोपर्यंत समाजाचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत आपल्या मानवी वर्तनात बदल होत नाही आणि कायद्याचा धाक राहत नाही, तोपर्यंत रस्ते अपघातांना आळा बसणार नाही, असेही गडकींनी सांगितले.
रस्ते अपघातांशी संबंधित खराब रेकॉर्डचा संदर्भ देत रस्ते मंत्री गडकरी म्हणाले, “जेव्हा मी आंतरराष्ट्रीय परिषदांना जातो आणि तेथे रस्ते अपघातांवर चर्चा होते तेव्हा मी तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो. कारण वाढते अपघात रोखण्यात आपल्या देशाचा रेकॉर्ड सर्वात घाणेरडा आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी खासदारांनी आपापल्या पातळीवर प्रयत्न करावेत, असे सांगत परिवहन विभागाच्या मदतीने सर्व शाळा, संस्था इत्यादींमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करावे असे ते म्हणाले.
https://x.com/OfficeOfNG/status/1867113512918761903