व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की कपड्यांना लावायचा चिमटा उलटा पकडला आहे. या लहान चिमट्याने भुईमुंगाच्या शेंगा सहज फोडल्या जात आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे भुईमुंगाची शेंग जर त्या चिमट्यात ठेवली आणि चिमटा दाबला की आपोआप शेंग फुटते आणि शेंगदाणे बाहेर पडतात. हा हटके जुगाड पाहून कोणीही थक्क होईल. beautiffulgram_to या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खूप चांगली कल्पना आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भुईमूगाच्या शेंगा फोडताना कंटाळा येतो ?…’हा’ अनोखा जुगाड पहा…व्हिडिओ
- Advertisement -