काँग्रेस नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार संदीप धुर्वे यांचा डान्सर गौतमी पाटील हिच्यासोबत नृत्य करतानाचा व्हिडीओ ‘एक्स’वर (X) शेअर केला आहे. या ट्विटमध्ये विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार संदीप धुर्वे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांच्या टीकेला संदीप धुर्वे यांनी प्रत्युत्तर देखील दिलं आहे. दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत भाजप आमदार धुर्वे चांगलाच ठेका घेताना दिसत आहेत. ते गौतमी पाटील हिच्यासोबत मंचावर नृत्य करताना दिसत आहेत. संबंधित व्हिडीओ विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरुन ट्वीट करत समोर आणला आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी नाचलो, अशी प्रतिक्रिया आमदार संदीप धुर्वे यांनी दिली आहे.
“भाजपचे आमदार म्हणजे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. अशी भयानक स्थिती जिल्ह्यात असताना अडचणीत असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे हे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त आहे”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
https://x.com/VijayWadettiwar/status/1831269677898821912?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1831269677898821912%7Ctwgr%5Eecb7847ee61e65fffb22ae2ff32d2eaa5db1f4ae%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fmaharashtra%2Fcongress-leader-vijay-wadettiwar-share-video-of-bjp-mla-sandip-dhurve-dance-with-gautami-patil-1263908.html