Sunday, December 8, 2024

video: गावाकडच्या आजीबाई पहिल्यांदाच एस्केलेटरवर गेल्या अन् कोसळल्या,नक्की काय घडलं

आपल्याला माहितीये शहराकडे गावाकडची जुनी, वयस्कर लोकं आली की त्यांना बावरल्यासारखं होत. आजूबाजूचं शहर त्यांच्यासाठी नवीन असल्यामुळे ते पुरते गोंधळलेले असतात. सोबत कुणी शहरातलं असेल तर ठिक नाहीतर कितीतरी लोक हरवतात सुद्धा. शहरात वावरताना प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी नवी असते. अगदी बाजारपेठांपासून, मॉल, रेल्वे स्टेशन सगळ सगळ. अशाच दोन आज्जीबाईंचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. शहरात पहिल्यांदाच आल्यावर त्यांच्यासोबत नक्की काय घडलं तुम्हीच पाहा.

एस्केलेटर किंवा सरकते जिने तुम्ही स्टेशन, मॉल, मेट्रो, विमानतळाजवळ पाहिले असणार. अनेकांनी याचा वापर देखील केला असणार. या जिन्यांमुळे लोकांना पायऱ्या चढायचा त्रास वाचतो आणि काही सामान असेल तरी तुम्ही त्याला नीट विना मेहनत घेऊन प्रवास करु शकता. पण यासंबंधी एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही तुमच्या घरातील वृद्ध व्यक्तींना एस्केलेटर एकटं जाण्यास नक्की रोखाल.
एस्केलेटरवर चढणे बर्‍याच लोकांसाठी खूप कठीण आहे. जे लोक दररोज एस्केलेटर वापरतात, त्यांच्यासाठी चढणे ही मोठी गोष्ट नाही. पण जे लोक एस्केलेटरवर पहिल्यांदाच चढत आहेत त्यांच्यासाठी ते हाताळणे खूप कठीण आहे. एस्केलेटरवर नर्व्हस होताना किंवा इतरांच्या मदतीने चढताना तुम्ही अनेकांना पाहिले असेल. मात्र अनेकवेळा काही लोक पहिल्यांदाच एस्केलेटरवर वापरत असताना अपघाताला बळी पडतात.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles