एक पार चक्रावून टाकणारा केक समोर आला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हा केक चक्क पाणीपुरी पासून तयार केलाय. तर सर्वात आधी ब्रेडचा बेस तयार केला. मग त्यावर पाणी पुरीची भाजी टाकली. ही भाजी ब्रेडमधून बाहेर पडू नये म्हणून भोवताली चॉकलेट क्रीमची भिंत तयार केली. मग त्या भाजीवर आणखी एक ब्रेड ठेवून त्यावर पुन्हा एकदा सेम प्रोसेज केली. शेवटच्या लेअरमध्ये शेव आणि विविध प्रकारच्या चटण्या मिक्स केल्या. आणि तयार झाला पाणी पुरी केक. हा केक महिलेनं आपल्या नवऱ्यासाठी वाढदिवसाची भेट म्हणून तयार केला होता. पण गंमतीशीर बाब म्हणजे हा केक पाहून खुद्द नवरा देखील शॉक झाला.
- Advertisement -