सर्वात आधी एक अननस रोस्ट करून त्याचे बारीक तुकडे केले. मग रोस्टेड अननसात कोथिंबीर, पुदिना आणि मिरच्या टाकून त्याची चटणी तयार करून घेतली. मग ही चटणी स्प्राईडमध्ये (कोल्डड्रींक) मिक्स करून त्यामध्ये थोडी तिखट बुंदी मिक्स केली. हे तिखट-गोड पाणी फ्रिजमध्ये थंड केलं. आणि अशा प्रकारे तयार झाली अननस पाणी पुरी. हा व्हिडीओ natashaagandhi या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ही रेसिपी अनेकांना आवडली असून त्यांनी या पाणी पुरीचं कौतुक केलं आहे.
- Advertisement -