ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 6 विकेटने जिंकला. टीम इंडियाने मालिका गमावली असली, तरी मालिकेत धारदार गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला घाम फोडलेल्या बुमराहला मालिकावीर घोषित करण्यात आले. संपूर्ण दौऱ्यात बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलिया असाच सामना रंगला. यशस्वी जैस्वाल आणि नितीश रेड्डीचा काहीसा अपवाद वगळता इतरांकडून साफ निराशा झाली. विराट आणि रोहित संपूर्ण मालिकेत अपयशी ठरले.
जसप्रीत बुमराह प्लेअर ऑफ द सिरीज होताच म्हणाला की, बरीच निराशा झाली, पण कधी कधी तुम्हाला तुमच्या शरीराचा आदर करावा लागतो, तुम्ही तुमच्या शरीराशी लढू शकत नाही. कदाचित मालिकेतील सर्वात मसालेदार विकेट हुकली. पहिल्या डावात त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये थोडं अस्वस्थ वाटलं. इतर गोलंदाजांनी पहिल्या डावात चांगली कामगिरी केली. एक गोलंदाज कमी असल्याने इतरांना जबाबदारी घ्यावी लागली. आज सकाळी आम्ही त्याच अनुषंगाने बोललो होतो. क्षमतेवर विश्वास ठेवण्याबद्दल आणि आपला खेळ दाखवण्याबद्दल चर्चा झाली, पण संपूर्ण मालिका खडतर होती, आम्ही अजूनही खेळात होतो, असे नाही की आम्ही त्यातून बाहेर पडलो, कसोटी क्रिकेट असेच चालते. https://x.com/cricketcomau/status/1875752976930971803






