Saturday, May 18, 2024

Video प्रसंगावधान व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर…13 वर्षीय मुलीची कमाल, घरात घुसलेल्या माकडांना..

उत्तर प्रदेशमधील एका १३ वर्षीय मुलीने घरात आलेल्या माकडांना पळवून लावले असल्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या संदर्भात एएनआय [ ने त्या १३ वर्षीय मुलीची मुलाखत घेतली असून, त्याचाच व्हिडीओ सध्या सर्व सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल होत आहे. मुलीने घडलेल्या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले, “त्या दिवशी आमच्या घरी काही पाहुणे आले होते; मात्र घरात येताना ते घराचं दार लावायला विसरले. त्याच दारातून माकडं स्वयंपाकघरामध्ये घुसली आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात नासधूस करायला सुरुवात केली. तेवढ्यात घरातली एक लहान मुलगी स्वयंपाकघरात गेली आणि सर्व दृश्य पाहून रडून तिथून पळायला लागली.” ती माकडं सर्व अन्न इकडे-तिकडे फेकत होती आणि खूप गोंधळ घालत होती. ते दृश्य पाहून आम्ही सगळेही घाबरलो होतो. मात्र, तेवढ्यात माझी नजर अलेक्सावर पडली. तेव्हा मी अलेक्साला कुत्र्याचा आवाज काढण्याचा आदेश दिला. त्याबरोबर त्या यंत्रानं कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज काढून दाखवला. तो आवाज ऐकतच एकेक करून सर्व माकडं घाबरून पळून गेली.” हे सांगताना त्या मुलीने पुन्हा एकदा अलेक्साला तोच आदेश दिला आणि यंत्राने भुंकण्याचा आवाज काढून दाखवला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles