व्हिडीओमध्ये तुळशीबाग येथील बाजारपेठेत एक गृहस्थ अनोख्या पद्धतीने त्यांच्या दुकानाचे मार्केटींग करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून कोणीही म्हणेल, “पुणे तिथे काय उणे” सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हे काका दुकानासमोर उभे राहून ग्राहकांना दुकानांना भेट देण्याची विनंती करत आहे. त्यांची मार्केटींग करतानाची अनोखी शैली पाहून तु्म्हीही भारावून जाल. काका दुकानासमोर उभे राहून म्हणतात, “तेरा ध्यान किधर है, चिकन करी अंदर है..तेरा ध्यान किधर है, चिकन करी अंदर है. तिकडे बघा, इकडे घ्या.. तिकडे बघा , इकडे घ्या.. शंभर रुपयांना दोन आहे, आज आमच्या दुकानाचा वाढदिवस आहे, शंभर रुपयांना दोन टॉप आहे.. संध्याकाळी खवा आईस्क्रिम फुकट आहे..” काकांची ही अनोखी शैली पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
Video..100 रुपयांना 2 टॉप.. संध्याकाळी खवा आईस्क्रिम फुकट.. पुण्यातील विक्रेत्याची अनोखी मार्केटिंग..
- Advertisement -