बॉलीवूड अभिनेता सलमान खान नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर सलमानचे निरनिराळे फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच सलमानने त्याचा भाऊ अभिनेता सोहेल खानचा ५३ वा वाढदिवस साजरा केला. घरच्यांच्याच उपस्थितीत सोहेलच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीनंतर सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो पापाराझींवर भडकल्याचे दिसून येत आहे.
सोहेलच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर सलमान त्याच्या आई-वडिलांबरोबर गाडीत बसत होता. सलमानला बघून पापाराझी त्याचे फोटो व व्हिडीओ घेण्यासाठी पुढे आले. पापाराझींना बघून सलमान भडकला व त्याने त्यांना मागे सरका असे सांगितले. व्हिडीओमध्ये सलमान रागात पापाराझींना ‘मागे सरका’ असे बोलताना दिसत आहे.