Video..स्ट्रीट फूडच्या नावाखाली वाट्टेल ते…आता बाजारात आईस्क्रिम पाव

0
24

स्ट्रीट फूडच्या नावाखाली हल्ली लोक वाट्टेल ते विकतायेत.आता एक नवा पदार्थ समोर आलाय. या पदार्थाला ‘आईस्क्रिम पाव’ असं म्हणतात. हा पदार्थ कसा तयार केला जातोय हे आता तुम्हीच पाहा. आतापर्यंत तुम्ही वडा पाव, भजी पाव, समोसा पाव असे पदार्थ खाल्ले असतील. पण आता बाजारात आईस्क्रिम पाव आलाय. सर्वात आधी पावांना छान बटरमध्ये भाजून घेतलं. मग त्यावर थंडगार आईस्क्रिमचा तुकडा ठेवला. बसं झालं आईस्क्रिम पावा. इतकी सोपी आहे रेसिपी. या रेसिपीचा व्हिडीओ birjuspavbhaji या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे.