व्हायरल व्हिडीओ एका फॅशन शोच्या कार्यक्रमातील आहे. या फॅशन शो मध्ये चिमुकल्यांनी सहभाग घेतलेला दिसत आहे. या व्हिडीओत अनेक चिमुकले रॅम्प वॉक करताना दिसत आहे पण व्हिडीओ पाहिल्या नंतर तुमची नजर एका चिमुकलीवर जाईल. ही चिमुकली अतिशय सुंदर रित्या रॅम्प वॉक करत पुढे येते. तिचे चेहऱ्यावरील हावभाव आणि पोझ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पांढरा क्रिम रंगाच्या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. एवढ्या कमी वयात ती सुंदरपणे रॅम्प वॉक करताना दिसतेय. तिचा रॅम्प वॉक पाहून काहींना त्यांच्या आवडत्या मॉडेलची आठवण आली असेल. हा व्हिडीओ चिमुकलीच्या शाळेतील कार्यक्रमातील असावा.
- Advertisement -