सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगा आपल्या घरी एका छोट्या फोनमध्ये ऑनलाईन क्लास करत आहे. सर जे काही सांगत आहेत ते तो आपल्या वहिमध्ये लिहून घेत आहे. आता असे करताना शिक्षणासह त्याला पोटाचीही भूक भागवायची आहे. मात्र त्याला भाकरी करून द्यायला कोणीच नाही. त्यामुळे हा चिमुकला स्वतःच भाकरी बनवत आहे. एकीकडे ऑनलाईन लेक्चर आणि दुसरीकडे तव्यावरची भाकरी यामध्ये शिक्षणासाठी सुरू असलेली त्याची धडपड पाहून अनेक नेटकरी भाऊक झालेत. साधारणपणे चौथी किंवा पाचवीचा हा मुलगा असावा. त्याने लेक्चर सुरू असतानाच भाकरी बनवायला घेतली आहे. भाकरी भाजल्यावर हा मुलगा ती भाकरी आपल्या हातानेच उलटत आहे. आता असं करताना अचानक त्याचा हात भाजतो. परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते हेच या व्हिडिओमधून समजतं.
Video एकीकडे ऑनलाईन लेक्चर अन् दुसरीकडे चुल्हीवरची भाकरी..लहान मुलाचा संघर्ष
- Advertisement -