नगर: काही महिन्यांपूर्वी टोमॅटो दरवाढ देशभरात चर्चेत होती. किलोला जवळपास २०० रूपये भाव मिळत होता. मात्र आता टोमॅटोचे दर इतके खाली आले आहेत की शेतकऱ्यांना ते बाजारात नेऊन विकणंही परवडत नाही. कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राहुरी तालुक्यातील कात्रड येथे दांगट यांनी कवडीमोल भाव मिळत असल्याने आपले टोमॅटो बाजारात न नेता जनावरांना खाऊ घातले.
- Advertisement -