हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरच्याघरी चाकू, विळी यांना जशी आपण धार लावतो, तशाच पद्धतीने मिक्सर भांड्याच्या ब्लेडलाही धार लावता येते. या गृहिणीने अगदी साधा उपाय सांगितला असून यासाठी तुम्हाला काहीही खर्च येणार नाहीये. तुम्हाला यासाठी फक्त मीठ हवं आहे, आता तुम्हाला नेमकं काय करायचं तर, एक मिक्सरचं भांड घ्या, त्यात दोन चमचे मीठ टाका आणि भांडं मिक्सरवर दोन ते तिन वेळा फिरवा. असं चार ते पाच वेळा केल्यानंतर तुम्हाला फरक कळेल, मिक्सरच्या ब्लेडला धार आली असेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादन असल्यामुळे मिक्सर ग्राइंडर व्यवस्थित साफ करता येत नाही, यावेळी ग्राइंडरही तुम्ही अशाच प्रकारे मीठानं स्वच्छ करु शकता. @madhuriscreativeworld21 युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
- Advertisement -