Tuesday, June 25, 2024

विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; असा आहे निवडणूक कार्यक्रम…

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या विधान परिषद निवडणुकांची नवी तारीख जाहीर करण्यात आलीय आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर,तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजी केली जाणार आहे. शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्याचे कारण देत विधान परिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.

असा आहे निवडणूक कार्यक्रम…
३१ मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार आहे. शेवटची मुदत ७ जून ठेवण्यात आली आहे. अर्जाची छाननी १० जून, अर्ज माघारी घेण्यासाठी १२ जून आणि मतदान २६ जून रोजी घेतले जाणार आहे. तर मतमोजणी १ जुलै २०२४ रोजी घेतली जाणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles