Monday, September 16, 2024

विधानसभा निवडणूक केव्हा होणार? दिवाळीआधी की दिवाळीनंतर…

नवीन विधानसभा नोव्हेंबरच्या अखेरीस अस्तित्वात येणार असल्याचं समोर येतंय. त्यामुळे आता आणखी काळ वाट पाहावी लागणार असल्याचं कळतंय. सध्या राजकीय नेते विधानसभेच्या कामात गुंतलेले दिसत आहेत. त्यासाठी मोर्चेबांधणी देखील समोर आलीय. तर आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होणार असल्याचं सांगितलं जातंय. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये तर मतमोजणी नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचं समोर येत आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेला जोरदार राजकीय संघर्ष सर्वांनीच पाहिला आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालंय, तर महायुतीला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. त्यामुळे विधानसभेत मतांचं गणित बदलणार की लोकसभेची पुनरावृत्ती होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने विधानसभेत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतलीय. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय, परंतु अजून मतदानाची तारीख, मतमोजणी केव्हा होणार? हे निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाही.

यंदा नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरूवातीला दिवाळी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे मतदान दिवाळी झाल्यानंतर होणार असल्याचं समोर येतंय. तर साधारण १४ किंवा १५ नोव्हेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा मुदत संपते त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवी विधनासभा अस्तित्वात येणं आवश्यक असतं. परंतु, सणासुदीच्या काळामध्ये निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे कदाचित निवडणुका दिवाळीनंतर होतील, असं सांगितलं जातंय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles