मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. यंदा कुणाची सत्ता येणार? महायुती आपलं सरकार कायम राखणार की महाविकास आघाडी बाजी मारणार? असे अनेक प्रश्न सध्या सर्वांसमोर आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी टाइम्स नाऊ, नवभारत आणि मॅट्रिझ यांनी एकत्रित सर्वेक्षण केलंय. जनतेचा कौल घेतलाय. तर या सर्व्हेदरम्यान भाजप हाच सर्वात मोठा पक्ष असल्याचं समोर आलंय.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत टाइम्स नाऊ नवभारत-मौट्रेझ या संस्थांनी संयुक्तरीत्या सर्वेक्षण केलं. त्यानुसार राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येण्याची शक्यता वर्तविली जातेय. या सर्वेक्षणानुसार लोकसभा निवडणुकीत जरी महाविकास आघाडीची सरस झाली असली तरी विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीची कामगिरी सरस ठरणार असल्याचं चित्र आहे.
राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार?
या सर्वेक्षणामध्ये महायुतीला १३७ ते १५२ तर महाविकास आघाडीला १२९ ते १४४ जागा मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. पक्षांचा विचार केलास, भाजप हाच राज्यातील सर्वांत मोठा पक्ष तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरणार असल्याचे संकेत देम्यात आले आहेत. राज्यामध्ये यंदा विधानसभा निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत होणार आहे.
ओपिनियन पोलमधील अंदाजानुसार महायुती सहजरीत्या राज्यात पुन्हा सरकार स्थापन करू शकते, असे निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत. सर्वेक्षणात भाजपला २६.२ टक्के मतं मिळाली आहेत. यासह भाजप ८३ ते ९३ जागांवर बाजी मारणार, असा अंदाज आहे. या ओपिनियन पोलनुसार विधानसभेमघ्ये भाजपची सरशी होण्याची शक्यता आहे.
ओपिनियन पोलमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही ६.८ टक्के मतांसह ४२ ते ५२ जागा जिंकू शकते, असा अंदाज आहे. अजित पवार गट २.८ टक्के मतांसह ७ ते १२ जागा जिंकेन, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
महाविकास आघाडीत काँग्रेसची कामगिरी उत्तम ठरू शकते. काँग्रेस १६.२ टक्के मत मिळवत ५८ ते ६८ जागा जिंकेन, असा अंदाज आहे. तर उद्धव ठाकरे गटाला १४.२ टक्के मतांसह २६ ते ३१ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाला १३.७ टक्के मतांसह ३५ ते ४५ जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे.