मुंबईतील विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण कार्यक्रम सोमवारी झाला. कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोर केवळ हिंदूह्दयसम्राट असे लावण्यात येऊ नये. ठाकरे यांच्या नावासमोर शिवसेनाप्रमुख असेही असावे अशी सूचना केली.
अजित पवार यांच्या भाषणानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी पवारांच्या सूचनेवर कडक शब्दांत समाचार घेतला. राणे म्हणाले की, मी आता अजित पवार यांचे भाषण ऐकले. त्यांनी अत्यंत चांगले भाषण केले. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे काय विशेषणं लावायची यावर बोलण्याच्या अधिकार बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासात असणाऱ्यांना आहे. त्यांनी बोलावे, असे सांगून राणे यांनी अजित पवार यांची सूचना कार्यक्रमातच हाणून पाडली.
केंद्रीय मंत्री राणेंनी अजित पवारांची ‘ती’ मागणी जागेवर धुडकावली…
- Advertisement -