लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात २६ जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. एकूण ४ मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. यासाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभेत एकही जागा न लढणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेने विधान परिषद निवडणुकीत आपले उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून मनसेने अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मनसेनं आपल्या अधिकृत X अकाउंटवरून परिपत्रक जारी करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.
“सन्माननीय राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी अभिजित पानसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे”, असं मनसेने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. इतकंच नाही तर, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी काही ठिकाणी सभा देखील घेतल्या होत्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी सभा देखील घेतली होती.
https://x.com/mnsadhikrut/status/1794916049374335316?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1794916049374335316%7Ctwgr%5E9fe77182c62c5e1e85f70d51d4ee19ccf611b363%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fmumbai-pune%2Fmns-nominated-abhijit-panse-from-konkan-division-graduate-constituency-for-vidhan-parishad-election-ssd92