राज्याच्या राजकीय वर्तुळातून अतिशय महत्वाची घडामोडी समोर आली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या कारवाईला आता वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता अॅक्शन मोडवर आले असून कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे
आमदार अपात्रता कारवाईला वेग आल्याने शिंदे गटातील आमदारांचं टेन्शन वाढलं आहे. येत्या एक ते दोन दिवसात राहुल नार्वेकर हे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस देखील बजावणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.राहुल नार्वेकर यांच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, “आमचे दिल्लीतील वकील, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आमची बाजू मांडली. त्यांच्याशी चर्चा करणं महत्त्वाचं आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाचा नेमका आदेश काय आहे? हेही समजून घ्यायला पाहिजे. यासाठी राहुल नार्वेकर दिल्लीला गेले आहेत. त्यात विशेष काही नाही
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना
- Advertisement -