विधासभेच्या निवडणूक कधी होणार याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगलेली असतानाच आता सत्ताधारी भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकांबद्दल एक मोठं विधान केलं आहे. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल आणि नोव्हेंबेरमध्ये मतदान होईल असा अंदाज अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
सध्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सगळेच पक्ष कमाल लागले आहेत. महायुतीला लोकसभेला राज्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्षांनी आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष मविआने देखील विधासभेसाठी आपल्या कार्यकर्त्याना कामाला लावलेले दिसत आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणूक कधी जाहीर होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी ऑक्टोबरमध्ये निवडणूका जाहीर होऊन नोव्हेंबेर महिन्यात मतदान होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र अंतिम निर्णय हा निवडणूक आयोगाचा असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय ठरवते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.