शिर्डी मतदारसंघातील नागरिकांची दिवाळी गोड व्हावी या दृष्टीने विखे पाटील कुटुंबियांकडून प्रत्येक कुटुंबास ०५ किलो साखरेचे वाटप करण्यात येत आहे. या अनुषंगाने राजुरी, ममदापूर गावातील नागरिकांना स्वयंवर मंगल कार्यालय येथे आणि बाभळेश्वर येथील नागरिकांना विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या प्रांगणात साखरेचे वाटप केले.
शिर्डी मतदारसंघातील समस्त नागरिकांचे प्रेम आणि आशीर्वाद महसूल मंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार डॉ. सुजय विखे पाटील व समस्त विखे पाटील कुटुंबियांना सातत्याने मिळत असते. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघ हा विखे पाटील कुटुंबीयांचाच एक भाग आहे, याच भावनेतून सर्वांची दिवाळी गोड व्हावी म्हणून सदरील साखरेचे वाटप केले जात आहे. राजकारणाच्या पलीकडे जावून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम या उपक्रमाच्या माध्यमातून होत असून नागरिकांनी देखील या उपक्रमाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले. समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
विखे पाटील कुटुंबियांकडून मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला साखर वाटप
- Advertisement -