महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत त्यांची मागणी चुकीची असल्याचे सांगितले. नगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
विखे पाटील म्हणाले, “ओबीसींमध्ये आरक्षण मिळावे, ही जरांगेंची मागणी चुकीची आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे ही पहिल्या लढ्यापासूनची मागणी आहे. इतरांच्या आरक्षणातून आरक्षण मिळावे, ही अपेक्षा त्यांनी करू नये,”