अहिल्यानगर : राज्याच्या राजकारणात सध्या इव्हीएमचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळलेलं यश हे इव्हीएम घोटाळ्याचे यश असल्याचे मविआचे अनेक नेते म्हणत आहेत. इव्हीएमच्या समर्थनार्थ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी काल मुंबईत आंदोलन केलं होतं. यानंतर भाजपच्या आणखी एका आमदारानं इव्हीएमच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. विक्रमसिंह पाचपुते यांनी इव्हीएमच्या प्रक्रियेवर विश्वास असल्याचं म्हटलं आहे. निवडणूक आयोगावर विश्वास आहे, या प्रक्रियेत काही घोटाळा असेल तर पहिल्यांदा समोर येईन आणि निवडणुकीला सामोरं जाईन असं म्हटलं आहे.
भाजपचे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी EVM संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. विक्रमसिंह पाचपुते यांनी इव्हीएमची प्रक्रिया 2019 ला जवळून पाहिल्याचं सांगितलं. बबनदादा पाचपुते यांच्या निवडणुकीवेळी निवडणूक प्रतिनिधी म्हणून मतमोजणी केंद्रात होतो. त्यावेळी समोरच्या उमेवारानं आक्षेप घेतला होता. त्यावेळी समोरच्या उमेदवारानं आक्षेप घेतले होते. यानंतर व्हीव्हीपॅटची मतं आणि इव्हीएमची मतं मोजली गेली होती. ती दोन्ही बरोबर राहिली होती, त्यात काही चूक नव्हती, असं विक्रमसिंह पाचपुते म्हणाले. आमदार पाचपुते पुढं म्हणाले की, इव्हीएमची टेक्नोलॉजी ही आहे ती आऊटडेटेड टेक्नोलॉजी आता वापरलेली आहे. ती आजच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे.रेडिओची टेक्नोलॉजी आहे, त्याच्यामध्ये कोणतीही फ्रीक्वेन्सी काम करु शकत नाही. हे सगळं निवडणूक आयोगानं माहिती सांगून देखील शंका उपस्थित केली जाते. नोकियाचे ब्लॅक अँड व्हाइट फोन यायचे, त्यावर तुम्ही फोटो पाठवू शकायचा का? आपण त्यात काहीच पाठवू शकत नसेल तर इव्हीएममध्ये कसा बदल होऊ शकतो. इव्हीएमला कनेक्टिव्हीटीला ऑप्शन काहीच नाही, असं विक्रमसिंह पाचपुते म्हणाले.
आमच्या मतदारसंघात 345 मशीन आहेत, 345 मशीनची छेडछाड कशी होणार आहे. प्रत्येक बुथवरील पोलिंग बुथ एजंटच्या सह्या असतात, फक्त आरोप करुन दिशाभूल केली जातेय. हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. लोकसभेला विरोधक खूश होतो. ते महाराष्ट्राचा सुवर्णदिवस आहे, असं सांगत होते, अशी टीका देखील विक्रमसिंह पाचपुते यांनी केली.