Saturday, December 7, 2024

नगर जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी विलास शिंदे तर व्हा. चेअरमनपदी शिवाजी मते यांची बिनविरोध निवड

नगर : अहमदनगर जिल्ह्याने संपूर्ण देशाला सहकार चळवळीची प्रेरणा दिली असून जिल्ह्यात सहकार क्षेत्राचे मोठे जाळे निर्माण झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने मिळाला आहे, शेतकऱ्यांच्या प्रगतीत सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे, अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी विलास शिंदे तर व्हा. चेअरमनपदी शिवाजी मते यांची बिनविरोध निवड झाली असून चेअरमन पदासाठी विलास शिंदे यांच्या नावाची सूचना संचालक भाऊसाहेब मोटे यांनी मांडली तर अनुमोदन संचालक सुधाकर नरवडे यांनी दिले, तसेच व्हा चेअरमनपदी शिवाजी मते यांच्या निवडीची सूचना संचालक प्रमोद गोंदकर यांनी मांडली तर अनुमोदन प्रशांत राऊत यांनी दिले, यावेळी प्रकाश नाईकवाडी, सुधीर राळेभात, सीताराम वर्पे, दीपक पठारे, सुदाम भुसे, युवराज तनपुरे, किरण पाटील, राहुल राजळे, अनिकेत शेळके, गणेश शेळके, भीमा भिंगारदिवे, ज्योती साबळे, रुपाली लांडगे, आदी उपस्थित होते, यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी गोंड यांनी काम पाहिले.
यावेळी चेअरमन विलास शिंदे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सहकारी सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील, याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जाईल,जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत पुरवठा कमी पडून दिला जाणार नाही, जिल्ह्यातील नेते मंडळींनी एकत्र येऊन माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी दिली, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातील असे ते म्हणाले,
व्हा. चेअरमन शिवाजी मते म्हणाले की, अहमदनगर जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सहकारी सेवा संस्थेने चांगले काम उभे करून जिल्ह्याचे नावलौकिक वाढवू,सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर निवडणूक बिनविरोध झाली आहे असे ते म्हणाले, यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles