भारतीय संघाचा माजी खेळाडी विनोद कांबळीची स्थिती अतिशय खराब झाली आहे. एकेकाळी स्टार असणाऱ्या कांबळीला आज चालताही येईना. सचिन तेंडुलकरचा मित्र विनोद कांबळीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामध्ये त्याला चालताही येत नसल्याचे दिसतेय.
एकेकाळी कोट्यावधी रुपयांची कमाई कमावणारा विनोद कांबळी आज एक-एक रुपयाला महाग झाला आहे. इतकेच काय तर परिस्थिती इतकी दयनीय झाली की चालताही येईना. क्रिकेट खेळत असताना चौकार अन् षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या कांबळी आज अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. सचिन तेंडुलकरचा जीवलग मित्र विनोद कांबळीला आज नीट चालताही येत नाही. विनोद कांबळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो बाईकचा आधार घेऊन उभा आहे.पण जेव्हा ते चालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते अडखळतो. त्यानंतर शेजारी उभे असलेले लोक त्यांना आधार देतात.
विनोद कांबळीला नेमकं काय झालं? याबाबत कोणताही अधिकृत माहिती नाही. पण सोशल मिडिया रिपोर्ट्सनुसार, मागील काही दिवसांपासून विनोद कांबळीची प्रकृती व्यवस्थित नाही. त्याला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होतं. कांबळीला हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्याशिवाय तो नैराश्यानेही ग्रस्त झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता व्हायरल झालेल्या व्हिडीओतून त्याची प्रकृती अतिशय नाजूक असल्याचे दिसतेय. विनोद कांबळीला चालताही येत नसल्याचे दिसत आहे.