उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग करण्यात आला आहे. ईव्हीएम प्रचार रथाचं अजितदादांनी उद्घाटन केलं आहे. या उद्घाटन प्रकरणीच जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांना नोटीस बजावली आहे. पुण्याच्या खेड आळंदीमधील हा प्रकार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवार हे पुन्हा अडचणीत आल्याचं दिसतं आहे.
विधानसभा निवडणूक सुरू होण्याआधीच आता आचारसंहिता भंगाचे किंवा निवडणूक आयोगाच्या नियमांच्या भंगाचे प्रकार समोर यायला लागले आहेत. राज्यातला हा पहिलाच प्रकार आहे, आणि तो देखील थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा भंग केला आहे. पुण्याच्या खेड आळंदी येथे अजित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या जनजागृती ईव्हीएम प्रचार रथाचं उद्घाटन केलं आहे. या प्रकरणाची जिल्हा निवडणूक शाखेने गंभीर दखल घेत तहसिलदार आणि प्रांत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र अजित पवार यांना कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. मात्र त्यांच्याकडून खुलासा मागवला जाण्याची शक्यता आहे.