ग्रामीण भागात यात्रोत्सवात अनेकांना बैलगाड्यांच्या शर्यतींची क्रेझ असते. या शर्यती भलत्याच रंगात येताना पाहायला मिळतात. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी अगदी नीट बोलायला न येणारे बाळ ते वयोवृद्धही येत असतात. अशातच फळीफोड पाहण्यासाठी बैलगाडा घाटाच्या दुतर्फा बसलेले बैलगाडा शौकीन आणि गाडा सुटताच दिली जाणारी आरोळी अशा या वातावरणाने घाटात मोठा थरार पाहायला मिळतो.एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, LP नावाचा बैल आणि पेठकरांचा राजा अशा दोन बैलांच्या जोड्या आणि आणखी बैलजोड्या अशी शर्यत लागली आहे. त्यामध्ये या बैलांना मार्गदर्शन करण्यासाठी या गाड्यांमध्ये एकेक व्यक्तीही दिसत आहेत. ते बैलांना योग्य दिशा दाखवीत, शर्यत जिंकण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम करतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर sachinkolekar_photography नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी व्हिडीओला ‘विजय नेहमी शांततेत मिळवायचा, लोकांना वाटत गेलं पाहिजे की, आपण हरतोय’ अशी कॅप्शन दिली आहे.