व्हिडीओमध्ये तुम्ही एका महिलेला तरुणाशी भांडताना पाहू शकता. आश्चर्याची बाब म्हणजे रागाच्या भरात ही महिला त्या तरुणाच्या तोंडावर थुंकली. अन् पुढे काय घडलं हे आता तुम्हीच पाहा. तरुणानं त्या महिलेसोबत असं काहीतरी केलं ज्याबद्दल कोणी स्वप्नातही विचार केला नसेल.
व्हिडीओ @crazyclipsonly या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत २ कोटींपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कुठल्याशा कारणावरून तरुणाचं बसमधील महिलेसोबत भांडण झालं. दरम्यान ती महिला इतकी भडकली की रागाच्याभरात अक्षरश: त्याच्या तोंडावर थुंकली. अर्थातच या कृतीमुळे मग त्या तरुणाला सुद्धा राग अनावर झाला अन् त्यानं त्या महिलेला थेट बसच्या बाहेर ढकलून दिलं. ती महिला अक्षरश: फुटपाथवर जाऊन पडली. दरम्यान दुसऱ्या एका महिलेनं तिला सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण तोपर्यंत तिला चांगलीच दुखापत झाल्याची शक्यता आहे.
व्हिडिओ पहा
https://x.com/crazyclipsonly/status/1734156067582677176?s=20