वडील आपल्या मुलीला नेहमी सुखात ठेवण्यासाठी आणि तिची काळजी घेण्यासाठी अनेक गोष्टी करतात. आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हीही भारावून जाल.व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आपल्या चिमुकलीला बाईकवरून फिरायला घेऊन गेलेले बाबा तिला त्यांच्या पुढ्यात बसवतात. पण, पुढे बसल्यावर तिला काही होऊ नये म्हणून आधीच त्यांनी स्वतःचा टी-शर्ट मध्यभागी फाडलेला असतो. या फाटलेल्या भागातून मुलीचं डोकं बाहेर काढून तिला टी-शर्टबरोबर पॅक करतात, यामुळे चिमुकली गाडीवर बसल्यावर सुखरूप राहू शकते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.https://www.instagram.com/reel/DCy-2CHskZY/?utm_source=ig_web_copy_link
- Advertisement -