हा व्हिडीओ diku_9051 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका महिलेला पाहू शकता जिनं आपल्या पोटावर एक पिशवी बांधून गरोदर असल्याचं नाटक केलं आणि सुपरमार्केटमध्ये चोरी केली. आश्चर्याची बाब म्हणजे तिच्या या पिशवीत विविध प्रकारच्या डाळी, शेंगदाणे, तेलाच्या पिशव्या इथपासून अगदी साखर, मसाल्यांपर्यंत जवळपास महिन्याभराचं सामान सापडलं. पण तिची ही चोरी यशस्वी ठरली नाही. दुकानाबाहेर पडताना तिला महिला सुरक्षा रक्षकांनी पकडलं आणि तिच्याकडून हे सर्व सामान परत घेतलं.
चोरीसाठी महिलेची अशीही ट्रिक…मॉलमध्ये गरोदरपणाचे सोंग करून गेली आणि केली हातसफाई…व्हिडिओ
- Advertisement -