धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील तीन वर्षाच्या मुलाचे नाव राष्ट्रपती आहे. या राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे मराठा समाजास आरक्षण देण्याची विनंती केली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात तीन वर्षाचा राष्ट्रपती म्हणतो, ” नमस्कार, मी राष्ट्रपती बोलतो. सरकारला विनंती आहे. मराठ्यांना आरक्षण द्या. मोदी साहेब, शिंदे साहेब, फडवणीस साहेब, अजित दादा या सगळ्यांना विनंती आहे. मराठ्यांना आरक्षण द्या. सध्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. जय महाराष्ट्र”
राष्ट्र्पती दत्ता चौधरी या मुलाचा जन्म 19 जून 2020 रोजी झाला आहे. त्याचे नाव राष्ट्रपती ठेवण्यावरून व त्याचे आधार कार्ड काढण्यावरून बरीच चर्चा झाली होती. आता मराठा आरक्षणाच्या व्हिडिओवरुन तीन वर्षांचा राष्ट्रपती चर्चेत आला आहे. राष्ट्रपतीचे वडील दत्ता चौधरी यांनीही मराठा आरक्षणाचे समर्थन केले आहे.