लग्नात एकमेकांना लाडू भरवण्याची प्रथा सुरू होती. नवरा नवरीला लाडू भरवण्याचा प्रयत्न करत होता. पण नवरी काही लाडू खायला नव्हती. तिनं आपलं तोंड दुसऱ्या दिशेला फिरवलं आणि ती नवऱ्याची फिरकी घेत होती. खरं तर हा प्रकार केवळ गंमत म्हणून सुरू होता. पण नवऱ्याला तो त्याचा अपमान वाटला. मग काय नवऱ्यानं शेवटी जबरदस्तीनं तिच्या तोंडात लाडू ठोसला. अर्थात ही बाब नवरीला काही आवडली नाही अन् तिनं देखील प्रतिकार करताना नवऱ्याच्या थोबाडीत मारली. मग जणू भर मांडवात युद्धच पेटलं. दोघांनी सुद्धा एकमेकांना अक्षरश: बुकलून काढलं. दरम्यान पाहुणे मंडळींनी मध्ये पडून दोघांना दूर केलं. हा व्हिडीओ nisha_sharma1430 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
एका लाडू वरून नवरा नवरीने भर मांडवात केली तुफान मारामारी… व्हिडिओ
- Advertisement -