सध्या मुंबई विमानतळाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डोसाची रेट लिस्ट या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे, व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इंस्टाग्राम यूजर शेफ डॉन इंडियाने शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये शेफ डोसा बनवताना दिसत आहे. त्याचबरोबर यूजरने लोकांना रेट लिस्टही दाखवली, या व्हिडीओने लोकांना विचार करायला भाग पाडले. व्हिडीओमध्ये असलेल्या मसाला डोसाची किंमत 620 रुपये आहे तर साध्या डोसाची किंमत 600 रुपये आहे. त्यानंतर तर अनेकांनी डोक्याला हात मारला असेल.जर एखाद्या ग्राहकाला डोसासोबत लस्सी किंवा फिल्टर कॉफी प्यायची असेल तर खर्च आणखी वाढतो. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- मुंबई विमानतळावर सोना डोसापेक्षा स्वस्त आहे.