पिझ्झामध्ये विविध प्रकार मिळतात, जसं पनीर पिझ्झा, व्हेजिटेबल पिझ्झा, चीज पिझ्झा इथपासून पार चिकन आणि चॉकलेट पर्यंत एका पेक्षा एक अतरंगी प्रकार पिझ्झामध्ये पाहायला मिळतात. पण आता बाजारात आणखी एक प्रकार आला आहे. या प्रकाराला ‘मिसळ पिझ्झा’ असं म्हणतात. होय, पिझ्झा आणि मिसळ यांचं फ्युजन या पदार्थामध्ये तयार करण्यात आलंय. या पिझ्झासोबत एक वाटी मिसळ दिली जाते. म्हणजे तुम्ही या मिसळीत पिझ्झा बुडवून खाल्ला की तयार होतो मिसळ पिझ्झा.
हा व्हिडीओ thegreatindianfoodie या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.